ई-मेल:- neskshirambe@gmail.com
मोबाईल नंबर:-9860213748 /9096526365


श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या अथक प्रयत्नातून 2003 रोजी कराड तालुक्यातील कासारशिरंबे गावामध्ये न्यू इंग्लिश स्कूल कासारशिरंबे या माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली.या ठिकाणी इयत्ता आठवी ते दहावी असे तीन वर्ग आहेत. तसेच या ठिकाणी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण कौशल्यपूर्ण विकास, हे तत्व मानून ग्रामीण भागात असणाऱ्या या शाळेने नावलौकिक मिळवला आहे. शिक्षण व्यवस्थेतील होणारा बदल त्यानुसार विद्यार्थी तयार करणे.
आमचे ध्येय
प्रत्येक विद्यार्थ्यांचा कौशल्यपूर्ण सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय.
दृष्टी
एकविसाव्या शतकातील विद्यार्थी तयार होण्याकरता प्रत्येक विद्यार्थ्याला सृजनशील, ध्येयनिष्ठ आणि स्वतंत्र विचार निर्मितीक्षम बनवणे.
आमची वैशिष्ट्ये
-
प्रशस्त व सुंदर इमारत निसर्गरम्य परिसर
-
स्मार्ट डिजिटल शाळा
-
प्रशस्त क्रीडांगण
-
स्वतंत्र ग्रंथालय
-
वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन
-
अनुभवी शिक्षक वर्ग
-
इयत्ता आठवी मोफत पाठ्यपुस्तके व शालेय पोषण आहार
विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी
-
एन एम एम एस या स्पर्धा परीक्षा 25 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक या अंतर्गत राज्यस्तरीय सारथी शिष्यवृत्तीसाठी 20 पेक्षा अधिक विद्यार्थी पात्र
-
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा 100% निकाल
-
शालाबाह्य परीक्षा मध्ये उत्तम यश जसे की हिंदी बाह्य परीक्षा इतिहास परीक्षा शंभर टक्के निकाल
-
इयत्ता दहावी उत्कृष्ट निकालाची परंपरा
-
शाळा सिद्धि अंतर्गत विद्यालयास अ श्रेणी प्राप्त
-
तालुक्यातील स्वच्छ शाळा व सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त
शिक्षणाची उद्दिष्टे
-
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे.
-
सजग व सक्षम नागरिक निर्माण करणे.
-
स्वच्छतेची आवड निर्माण करणे.
-
पर्यावरणाचे रक्षण करणे.
-
सामाजिक कार्याची जाणीव करून देणे.
-
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे.
-
बदलती शिक्षण पद्धती स्वीकारणे.


श्री. मोहिरे जीवन विलास
मुख्याध्यापक
मुख्याध्यापक संदेश
सर्वांना नमस्कार,
ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरज लक्षात घेऊन श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेने व कासारशिरंबे गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून कासार शिरंबे गावामध्ये इयत्ता आठवी ते दहावी या माध्यमिक विद्यालयाची स्थापना जून 1998 रोजी केली. सध्या विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीचे तीन वर्गांमधून 152 विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत असून पाच शिक्षक अध्यापनाचे कार्य करत आहेत तसेच तीन शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.विद्यालयाचा इयत्ता दहावी मार्च 2024 चा निकाल शंभर टक्के लागलेला आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विद्यालयांमध्ये शालेय व सहशालेय उपक्रमांचे आयोजन केले जाते.जसे की, पाककला, रांगोळी, चित्रकला, मेहंदी, वक्तृत्व, निबंध, पुष्परचना इत्यादी विद्यालयाने ग्रामीण भागात अल्पावधीतच खूप नावलौकिक मिळवला आहे आणि आताही संपूर्ण शाळा डिजिटल शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.तसेच विद्यालयांमध्ये शालेय व सहशालेय क्रीडा स्पर्धा शालेय बाह्य स्पर्धा परीक्षा इत्यादी क्षेत्रांमध्ये सुद्धा शाळेने आपले स्थान शिक्षण क्षेत्रामध्ये भक्कम उभारले आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्ता या दृष्टिकोनातून विद्यालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आणि पर्यावरण पूरक उपक्रम केले जातात.
आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !!!