top of page
Location
Email Id
Contact No.

Photo Gallery

नवागतांचे स्वागत
विद्यालय दरवर्षी इ.आठवी मध्ये नवीन विद्यार्थी प्रवेश घेत असतात. त्यासोबतच इयत्ता नववी व दहावी मध्ये सुद्धा नवीन विद्यार्थी येत असतात. या सर्व नवगतांचे स्वागत मोठ्या थाटामाटात लेझीम झांज वाजत गाजत केले जाते. विद्यालयातील विद्यार्थी संख्या ही अतिशय उत्कृष्ट असून प्रत्येक वर्षी ही संख्या वाढत जात असते.





जयंती व पुण्यतिथी साजरा
विद्यालयामध्ये विविध थोर पुरुषांच्या,शास्त्रज्ञांच्या, शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा केल्या जातात.या निमित्ताने विद्यालयांमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये निबंधलेखन,चित्रकला, वक्तृत्व, पोवाडे, गीतगायन,कथाकथन आणि प्रश्नमंजुषा अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात.





दहावी शुभचिंतन समारंभ
दरवर्षी विद्यालयातून इयत्ता दहावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट होत असतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या भविष्याची चाहूल निर्माण होते. त्यांच्या भावी वाटचालीसाठी विद्यालयाकडून शुभेच्छा देण्यासाठी शुभचिंतन समारंभ आयोजित केला जातो. वर्षभरातील विविध उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेणारे त्यांचे कौतुक व तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जातात.

शिक्षक दिन 5 सप्टेंबर
विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आनंदात पार पाडला जातो या कार्यक्रमाप्रसंगी कासारशिरंबे परिसरातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक अंगणवाडी सेविका, सेवानिवृत्त शिक्षक , महाविद्यालयीन अध्यापक यांचा सत्कार आयोजित केला जातो.यामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व पतसंस्था यांचे मोठे सहकार्य लाभते.

गणेश चतुर्थी
Video Gallery




bottom of page