top of page

Location

Email Id
Contact No.

आमची सुविधा

Abstract Structure

विद्यालयात महाराष्ट्र राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबवला जातो. इयत्ता आठवीचा वर्ग हा प्राथमिक विभाग अंतर्गत असून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीनुसार शालेय व सहशालेय विषयांना प्राधान्य दिले जाते. कृतीयुक्त, गणित व शिक्षण पेटीचा वापर, कला संगीत कार्यानुभव शारीरिक शिक्षण या सहशालेय विषयांना सुद्धा प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन जास्तीत जास्त आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.

 

कृतीयुक्त अध्यापन पद्धती

उच्च प्राथमिक विभाग

kas1.jpg

माध्यमिक विभाग अंतर्गत विद्यालयात नववी ते दहावीचे वर्ग आहेत. विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघांचाही या वर्गामध्ये प्रवेश होत असून विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन हे दिलेल्या प्रथम द्वितीय सत्र आणि त्याबरोबरच घटक चाचणी स्वरूपात होत असते. तज्ञ व प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा, शाळा बाह्य परीक्षा,सहशालेय व शालेय उपक्रमात सहभाग घेण्यास प्रेरणा देतात.आधुनिक तंत्रज्ञान व शैक्षणिक साहित्याचा वापर करून अनुभव संदर्भ याद्वारे अध्ययन अध्यापन पद्धती जास्तीत जास्त प्रभावी केली जाते.

 

डिजिटल तंत्रज्ञानाचा साधनांचा वापर करताना विद्यार्थी

माध्यमिक विभाग

kas2.jpg

शालेय अध्यापन अध्ययन यासोबतच विद्यार्थ्यांमधील नेतृत्व,संघभावना,सहकार्य, शारीरिक तंदुरुस्ती व नियंत्रण या गोष्टी विकसित करण्यासाठी विद्यालयात विविध खेळांचे आयोजन केले जाते .तसेच शाळा अंतर्गत, संस्थांतर्गत,तालुका, जिल्हा, राज्य, आणि विभागीय स्तरावरती विद्यार्थ्यांना खेळामध्ये स्पर्धेमध्ये उत्तम यश मिळवण्यासाठी नेहमी प्रोत्साहित केले जाते. बैठे व मैदानी खेळ, खेळांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण स्पर्धा, आणि उन्हाळी क्रीडा शिबिर विद्यालयात घेतले जाते. जसे की,

  • हॉलीबॉल

  • बॅडमिंटन

  •  क्रिकेट

  • कबड्डी

  • खो-खो

  •  कॅरम

  •  बुद्धिबळ

  • ऍथलेटिक्स :- रनिंग, जम्पिंग, थाळी,भाला,गोळा.

  •  योगा प्राणायाम

क्रीडा विभाग

kas3.jpg

विद्यालयात स्वतंत्र अशी प्रयोगशाळा उपलब्ध असून विज्ञान विषयांतर्गत विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रात्यक्षिक करून घेतले जाते. त्यासाठी आवश्यक  साहित्य प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध आहे.  विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध प्रयोग करून पाहतात.

प्रयोगशाळा

kas4.jpg

शैक्षणिक वर्ष 2025 मध्ये पूर्ण शाळा डिजिटल शाळा म्हणून नावारूपाला आली इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गामध्ये तीन इंटरऍक्टिव्ह बोर्ड  अध्ययन - अध्यापनासाठी बसवण्यात आले असून विद्यालयामध्ये प्रयोगशाळेत स्मार्ट टीव्ही चा वापर केला जातो.तसेच तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना संगणक, लॅपटॉप यांचेही ज्ञान अवगत  व्हावे यासाठी शाळेमध्ये स्वतंत्र संगणक कक्ष उपलब्ध आहे.विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचा वापर आपल्या दैनंदिन अध्ययनात सुद्धा करतात. शिक्षक अध्यापनासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करतात.

संगणक कक्ष

kas5.jpg
bottom of page